Konkan Ganeshotsav Trains Reservation
ठाणे : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, गणेशभक्तांना रांगेत उभे राहण्याची दमछाक होऊ नये, यासाठी शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने खास गौरी गणपतीसाठी ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षणासाठी दोन अतिरिक्त खिडक्या आजपासून (दि.२०) सुरु करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाला कोकणात जाण्याऱ्या चाकरमान्यांना तिकीट आरक्षणासाठी खिडकी क्रमांक ७ आणि ८ वर या अतिरिक्त खिडक्या आजपासून सुरु करण्यात आल्या आहेत. या आरक्षण खिडकीचे उद्घाटन शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गौरी गणपतीच्या सणाला रेल्वेने आपआपल्या गावी जाण्यासाठी चाकरमानी प्राधान्य देतात. त्यामुळे आरक्षण करण्यासाठी मोठी गर्दी असते. खिडक्या आहेत त्या कमी पडतात. त्यामुळे कोकण वासियांकडून खिडख्या वाढविण्याची मागणी होत होती. त्यामुळे गणपती काळात दोन खिडक्या वाढवलेल्या आहेत.