Konkan Railway Ganpati Special Trains| कोकण रेल्वे मार्गावर जादा गणपती स्पेशल गाड्या सोडा

Passenger Committee Konkan Railway | कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
Konkan Ganpati special trains
Konkan Ganesh Festival Special Trains(File Photo)
Published on
Updated on

Extra Trains For Ganesh Festival

वसई : दरवर्षी गणेश उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात,गणेशभक्तांच्या तूलनेत कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार्‍या मेल / एक्सप्रेस अतिअल्प असल्याने यावर्षी कोकणाला गणपतीसाठी साधारणता जादा 500 फेर्‍यांची आवश्यकता आहे,गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट रोजी असल्याने 18 ऑगस्ट ते 10 सप्टेबर दरम्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रत्येक दिवसाला किमान 8 अप आणि 8 डाऊन अशा नवीन जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडाव्यात तर दरम्यानच्या काळात कोकण रेल्वे वरील कंटेनर वाहतूक ( मालगाडया ) पूर्णतः बंद कराव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेने कोकण रेल्वे,मध्य व पश्चिम रेल्वेकडे केली आहे.

यामध्ये सर्व मेमू रेल्वे 12 ऐवजी 22 किंवा 24 कोचच्या चालवाव्यात,कोकणातील चाकरमन्यांची वस्ती ही पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरात जास्त असल्याने जादा गणपती स्पेशल पनवेल ऐवजी दादर,वांदे,वसई,कुर्ला व दिवा येथून सोडण्यात याव्यात.

Konkan Ganpati special trains
Konkan Railway : कोकणात कोकण रेल्वेवरूनही आता वाहने जाणार

दिवा रोहा मेमूचा विस्तार चिपळूणपर्यंत करण्या ऐवजी मुंबई ते चिपळूण/खेड पर्यंत नवीन मेमू चालवाव्यात,कल्याणमार्गे पुणे ते सावंतवाडी दरम्याने एक्सप्रेस चालवाव्यात,गेल्यावर्षी अनारक्षित रेल्वे उशिराने जाहिर केल्याने त्याची माहीती चाकरमन्यांपर्यंत पोहोचली नाही परिणामी त्या रिकाम्याच धावत होत्या यावर्षी त्या लवकर जाहिर कराव्यात.

Konkan Ganpati special trains
Ganesh Festival : गणपतीला कोकणात जाणार 12 लाख चाकरमानी!

यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी,दादर,कुर्ला,ठाणे,दिवा, कल्याण व पनवेल येथून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,वांद्रे,वसई,वलसाड,उधना,अहमदाबाद,सुरत येथून कोकण रेल्वे मार्गावरचिपळूण,खेड,थिमिव,करमळी,मडगाव दरम्याने आरक्षित जादा गणपती स्पेशल रेल्वे चालवाव्यात.तर गर्दी कमी करण्यासाठी वसई ते चिपळूण, पनवेल ते खेड,दिवा ते चिपळूण,दादर ते रत्नागिरी व पनवेल ते कुडाळ / सावंतवाडी दरम्याने अनारक्षित मेमू रेल्वे चालवाव्यात. गणपतीच्या कालावधीत तुतारी एक्सप्रेस 24 कोचची चालवावी किंवा दादर ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित डब्बलडेकर चालवाव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news