Ashadhi Ekadashi : आषाढीसाठी ठाणे विभागातून जादा बस Pudhari File Photo
ठाणे

Ashadhi Ekadashi : आषाढीसाठी ठाणे विभागातून जादा बस

ठाणे विभागातील सर्व आगारातून २ जुलै पासून जादा बसेस सोडण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

Extra bus from Thane section for Ashadhi Wari

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत. पण सगळ्यांना काही दिंडीत चालणं जमत नाही, अशा भक्तांसाठी लालपरीने पंढरीला जाण्यासाठी सोय केली आहे.

६ जुलैला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या ठाणे विभागातील सर्व आगारातून २ जुलै पासून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच ६ ते १३ जुलै दरम्यान पंढरपूर येथून भाविकांसाठी परतीच्या वाहतूकीची सोय करण्यात आली आहे.

ठाणे विभागातील ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, बोरिवली (नॅन्सी कॉलनी) येथून २ जुलै पासून पंढरपूरसाठी बसेस सोडण्यात येणार आहे.

त्यासाठी वैयक्तीक व समूह पध्दतीने आरक्षणाची सोय महामंडळाने केली आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजनांचा लाभही संबंधित प्रवाशांना या सेवेत घेता येणार आहे.

बस सुटण्याची वेळ

बोरिवली-सायन पंढरपूर सकाळी ८ वा. व रात्री ८ वा.

ठाणे - फलटण - पंढरपूर सकाळी ७ वा. व रात्री ८ वा.

कल्याण फलटण पंढरपूर सकाळी ६ वा. व सायं. ७ वा.

शहापूर- ठाणे फलटण- पंढरपूर सकाळी ६ वा.

विठ्ठलवाडी नगर फलटण पंढरपूर रात्री ९ वा.

कल्याण- नगर फलटण- पंढरपूर रात्री ९ वा.

विठ्ठलवाडी नगर फलटण पंढरपूर रात्री ८ वा.

वाडा- ठाणे पुणे पंढरपूर सायंकाळी ६ वा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT