ठाणे ः ग्रामीण आणि निमग्रामीण क्षेत्रातील 375 नगरपरिषदा, 29 महापालिकांमध्ये मराठी भाषिक युवकांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषिक युवकांसाठी क्षमता वृध्दी केंद्र सुरू करण्याची गरज आहे. त्याची सुरवात ठाण्यातून करावी. अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच मराठीच्या संवर्धनाला निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभिजात मराठी भाषाग गौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यात मराठी भाषेसंदर्भात समर्पित वृत्तीने कार्यरत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी वरिष्ठ अधिकारी तथा साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, ज्येष्ठ लेखक प्राचार्य अशोक चिटणीस, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, मराठी संशोधन मंडळाचे माजी अध्यक्ष व लेखक डॉ. प्रदीप कर्णिक यांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे व मान्यवर उपस्थितीत होते. त्यावेळी ते बोलत होते.
मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी नगरविकास, उद्योग आणि मराठी भाषा विभाग या तिन्ही भागांनी एकत्र येवून कार्य करण्याचा निर्णय घ्यावा. अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, ग्रामीण आणि निमग्रामीण क्षेत्रातील 375 नगरपरिषदा.29 महापालिकांमध्ये मराठी भाषिक युवकांसाठी क्षमता वृध्दी केंद्र सुरू करण्याची गरज आहे.
मराठीच्या सक्तीपेक्षा भक्तीची भावना महत्वाचे असल्याचे मराठीच्या संवर्धनाला निधीची कमतरता पडणार नाही. बारावी पर्यंत मराठी सक्तीची, तांत्रिक व्यवसाय शिक्षण मराठीतून दिला जाते. प्रास्तविक मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.
दोडक्या बहिणींचा विचार करा
या कार्यक्रमात एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले असता प्रेक्षागृहातील एका वयस्कर महिलेने साहेब लाडक्या बहिणींप्रमाणे दोडक्या बहिणींचा पण विचार करा, अशी मागणी उभे राहून केली. त्यावर शिंदे म्हणाले, शेतकर्यांचाही विचार करायचा आहे, सगळे लाडके आहेत, तुम्ही मला नंतर येवून भेटा अशी सूचना शिंदे यांनी त्या भगिनीला केली.
मंत्री गणेश नाईक यांची अनुपस्थिती
अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव होते मात्र त्यांनी कार्यक्रमला न येणे पसंत केले. सध्या शिवसेना-भाजप मध्ये सुरू असलेल्या कलगीतुर्याच्या पार्श्वभूमीवर ही अनुपस्थिती चर्चेचा विषय होती. भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर हेही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
सरन्यायाधीश भूषण गवई प्रकरणाचा निषेध
देशात न्यायव्यवस्था सर्वोच्च स्थानावर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसा असलेले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हल्ला प्रकरणाची निंदा करावी, तेवढी कमीच आहे. हे कृत्य घटनाबाह्य आहे, त्याचा मी निषेध करतो. गवई यांच्याबाबत रामशास्त्री बाण्याचे सरन्यायाधीश असा दाखला दिला जातो. सर्वोच्च पदावर असताना त्यांच्या वागण्यात नम्रता वेळोवेळी दिसून येते. असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेला 1 कोटी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेला 1 कोटी देण्याची घोषणा केली होती. तो निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या खात्यात येत्या आठवडाभरात वर्ग होईल, अशी घोषणा राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.