Eknath Shinde Health pudhari
ठाणे

Eknath Shinde Health: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आला अशक्तपणा... ठाण्यातील रूग्णालयात दाखल

Eknath shinde Latest News: सततचे दौरे, बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटी यामुळं त्याचा ताण त्यांच्या प्रकृतीवर पडला.

Anirudha Sankpal

Eknath Shinde Health : राज्याचे उपमुख्यमंत्री एकानथ शिंदे यांना ठाण्यातील ज्युपीटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सततची धावपळ आणि दौरे यामुळं एकनाथ शिंदे यांना सर्दी, ताप खोकला झाला आहे. त्यांना भरपूर अशक्तपणा आल्यामुळं अखेर ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडत होता. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठी धावपळ झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष देत आहेत. सततचे दौरे, बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटी यामुळं त्याचा ताण त्यांच्या प्रकृतीवर पडला. त्यातही ते सलाईन लावून दौरे करत होते. त्यांचा पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांची पत्नी त्यांना वारंवार प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देत होते. मात्र त्यांनी आपल्या कामाचा धडाका तसाच सुरू ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT