Driver And Trafic Police Issue (Pudhari File Photo)
ठाणे

Kalyan Traffic Incident | स्वतःचा मर्डर करवून तुम्हा सर्वांना कामाला लावेन...

कल्याणच्या चक्की नाक्यावर तर्राट ड्रायव्हरचा धिंगाणा; वाहतूक पोलिसांना धाक/धमक्यांसह धक्काबक्की

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : तुम्हाला महेश गायकवाड, महेश पाटील यांचे समर्थन आहे का ? थांबा मी स्वतःचाच मर्डर करून घेतो आणि तुम्हा सगळ्यांना कामाला लावतो, असे बेताल वक्तव्य करत उल्हासनगरमध्ये टेम्पोच्या तर्राट चालकाने धिंगाणा करून परिसरासह वाहतूक नियंत्रण शाखेचे कार्यालय डोक्यावर घेतले. हा प्रकार गुरूवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कल्याण पूर्वेकडे असलेल्या चक्कीनाका येथील कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीत घडला. धिंगाणा घालत या मद्यपीने वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना शिवीगाळ, शिवीगाळ, दमदाटी, अरेरावी भाषा आणि धक्काबक्की करून जासकीय कामात अडथळा आणला.

महेश मल्हारी साळंखे (४०, रा. भीमनगर उलसाहनगर - १) असे मद्यपी चालकाचे नाव आहे. या घटनेनंतर कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंदराव हनमंतराव थोरात (४९) यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार सदर टेम्पो चालकाच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३२, १२१ (१), ३२४ (४) अन्वये गन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात वाहतुकीचे नियोजन आणि नाकाबंदीचे काम सुरू असताना दूरवरून एक चालक त्याच्या ताब्यातील टेम्पो निष्काळजीपणे, तसेच इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने चालवत असल्याचे निदर्शनास आले. टेम्पो जवळ येताच पोलिसांनी त्याला रोखले. टेम्पोचा चालक महेश साळंखे याने तुम्ही मला का अडविले, अशी विचारणा करून वाहतूक पोलिसांबरोबर हज्जत घातली. वाहतूक पोलिसांनी श्वास विश्लेषक चाचणी करण्यासाठी त्याला टेम्पोतून खाली उतरविले. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने तो टेम्पोतून उतरण्यास तयार नव्हता. मोठ्या मुश्किलीने पोलिस आणि वॉर्डनील त्याला टेम्पोतून खाली उतरविले. त्याला चक्कीनाका येथील वाहतक विभागाच्या कार्यालयात आणले. तेथे वाहतूक पोलिसांनी त्याची ब्रेथ ऑनालायझर अर्थात श्वास विश्लेषक चाचणी करण्यास सरूवात करताच त्याने चाचणीला विरोध केला.

कोणत्या अधिकाराने माझी श्वास विश्लेषक चाचणी (ब्रेथ ऑनालायझर) करता ? असा सवाल करत असे प्रश्न करून महेशा साळंखे याने एका पोलिसाच्या सदच्याची गळपट्टी पकडली. त्यांना धक्काबूक्क केली. बेभाम झालेला मद्यपी चौकीतील अन्य तीन-चार वॉर्डनसह पोलिसांच्या अंगावर मारण्यासाठी धाऊन जात होता. वाहतूक पोलिस त्याला रोखन धरत होते. या झटपटीत त्याने कार्यालयातील संगणकाची वायर तोडली. पोलिसांच्या जेवणाचे डबे टेबलावरून ढकलून दिले. तृम्ही माझ्या बरोबर एवढी झटापट करता म्हणजे तुम्हाला महेश गायकवाड, महेश पाटील यांचे समर्थन आहे का, अशी बेताल वक्तव्ये टेम्पोच्या चालकाने स्वत:चे डोके चौकीतील खिडकीवर आपटून स्वत:ला जखम करून घेतले. वाहतूक पोलिसांसह वॉर्डनही बेभाम महेश साळंखेला अटकाव करत होते. तरीही तो दाद देत नव्हता. अखेर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वाय. एम. धोंगडे अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT