ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल रेल्वे सेवांमध्ये दिवसाढवळ्या गर्दुल्यांकडून सेवन केले जात असते. मात्र रेल्वे पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे अशा नशेखोरांना आला घालता येत नाही असे संतप्त प्रवाश्यांचे म्हणणे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण रेल्वे स्थानकातून अप मार्गावर आणि डाऊन मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकल रेल्वे सेवांमध्ये खुलेआम नशेखोर अमली पदार्थचे सेवन करत असल्याचे धक्कादायक प्रकार सहजच घड असतात.
अलीकडेच कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना माध्यमांद्वारे समोर आली आहे. दुपारी 3 वाजून 12 मिनिटांच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रवास करणाऱ्या लोकल सेवेच्या माल डब्ब्यामध्ये माथेफिरू तरुणाने अमली पदार्थाचे सेवन खुशालपणे सगळ्या प्रवाशांसमोर काही प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केले असता.
माथेफिरू तरुणाने इतर प्रवाश्यांना उलट उत्तरे देत दमदाटी केली. त्याचप्रमाणे 9 डिसेंबर, रोजी एका नशेखोराला कल्याणहून बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवास करत असलेल्या लोकल रेल्वे सेवेमध्ये इतर प्रवाश्यांद्वारे चांगलाच चोप देण्यात आला.
प्रवाश्यांच्या म्हणण्यानुसार असे नशेखोर रात्रीच्या काळात लोकलमध्ये नशे करून इतर प्रवाशांना धमकावत असतात. व मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे पोलिसांच्या डोळेझाक वृत्तीमुळे गर्दुल्ले खुलेआम लोकल रेल्वे सेवांमध्ये अपराध करत असतात. मात्र रात्रीच्या वेळेमध्ये लोकल रेल्वे सेवांमध्ये रेल्वे पोलीस नियुक्त नसल्यामुळे अशा नशे खोरांना अपराध करण्यास वाव भेटत असते असे संताप प्रवाशांचे म्हणणे आहे.
मुंबई उपनगरीय मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवांमध्ये एन गर्दीचे काळ बाजूला सारून. इतर वेळी रेल्वे पोलीस म्हणजेच लोहमार्ग पोलीस अथवा रेल्वे सुरक्षा बल लोकल रेल्वे सेवांमध्ये तैनात कारवाई अशी प्रवाशांची मागणी आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे लक्ष्य देत तातडीने प्रत्येक लोकल रेल्वे सेवांमध्ये रेल्वे पोलीस तैनात करून लोकल सेवांमध्ये होणाऱ्या अपराधांवर आळा घालावे असे प्रवाशांचे म्हणणे आहे.