Drone Flying Ban
मिरा रोड : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांत कोणत्याही व्यक्तीला ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालविण्यास, उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश ३ जून २०२५ पर्यंत राहणार आहेत.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र यांचा वापर काही असामाजिक तत्त्वांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उपकरणांचा अनियंत्रीत वापर टाळण्यासाठी त्वरीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने सुहास बावचे, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश ३ जून २०२५ पर्यंत लागू राहणार आहेत.
कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम-२२३ तसेच लागू असलेल्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येतील. हे आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी पध्दतीने लागू करण्यात आले असल्याचे पोलीस उप-आयुक्त मुख्यालय, सुहास बावचे यांनी सांगितले आहे.