ठाणे

डोंबिवलीत वाचन संस्कृती वाढावी यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीकडून पुस्तक आदान प्रदान कार्यक्रम

अमृता चौगुले

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली शहराचे नाव नेहमीच सांस्कृतिक नगरी म्हणून घेतले जाते. याच नगरीत वाचन संस्कृती वाढावी यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीकडून पुस्तक आदान प्रदान या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी डोंबिवलीतील माजी नगरसेवकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या कार्यक्रमाला या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे सांस्कृतिक शहर असलेल्या डोंबिवली शहराचे नगरसेवक वाचन संस्कृतीचे वारकरी आहेत का, असा सवाल करण्यात आला.

पै फ्रेंड्स लायब्ररीकडून पुस्तक आदान प्रदान या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु याना आमंत्रण देण्यात आले असून मी येण्याचा प्रयत्न करते असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती पै यांनी दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच विविध साहित्यिक, लेखक आणि कलाकारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी डोंबिवलीतील विविध घटकांना समाविष्ट करून हा कार्यक्रम करण्याचे पै फ्रेंड्सचे पुंडलिक पै यांनी ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी आम्ही नगरसेवक डोंबिवलीचे, वारकरी वाचन संस्कृतीचे या कार्यक्रमाचे आयोजन माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंदिर संस्थानाच्या सभागृहात करण्यात आले होते.

या कार्यक्रमात 75 वर्षीय माजी मंत्री जगन्नाथ पाटील तब्येत बरी नसतानाही उपस्थित होते. मात्र एकही नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. यासंदर्भात जगन्नाथ पाटील यांनी नगरसेवकांची बाजू सांभाळत निवडणूक जवळ येऊ घातल्या आहेत. त्यानिमित्ताने कामात अडकल्याने नगरसेवकांनी यायला जमलं नसेल असे सांगितले. इतकेच नव्हे तर मी या उपक्रमासाठी मदत करेन असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे नगरसेवक खरच वाचन संस्कृतीचे वारकरी आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठाण्यावर करणार भाजप दावा माजी मंत्र्यांचे सूतोवाच

ठाणे जिल्हा हा रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तो पुन्हा मिळवण्या सक्तही भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेषतः ठाणे लोकसभेवर खासदार राजन विचार हे उडधाव ठाकरे गटाचे खासदार आहेत . जर पक्षाने ठरवले तर माजी मंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र माजी खासदार संजीव नाईक याना तिकीट दिले जाऊ शकते असे सूतोवाच माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी पै फ्रेंड लायब्ररीच्या कार्यक्रम दरम्यान केले.

.हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT