ठाणे

डोंबिवली : वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या विशाखचा केरलीयन समाजकडून सत्कार

अविनाश सुतार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: तुतारी, ढोल, झांज या पारंपरिक वाद्यांचा निनाद, पारंपरिक वेशभूषा, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा जल्लोषी वातावरणात डोंबिवलीतील मॉडेल महाविद्यालयाच्या प्रांगणात केरळ राज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त डोंबिवलीतील केरलीयन समाज एकत्र आला होता. यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड करणारा धावपटू विशाख कृष्णस्वामी याचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र आमची कर्मभूमी आणि केरळ आमची जन्मभूमी आहे. त्यामुळे दोन्ही राज्य आम्हाला सारखीच प्रिय असल्याचे प्रतिपादन केरलीयन समाजाचे चेअरमन वर्गीस डॅनीअल आणि जनरल सेक्रेटरी राजशेखरन नायर यांनी केले. या कार्यक्रमासाठी मॉडेल महाविद्यालयाचे प्रांगण केवड्याच्या पानांचा वापर करून आकर्षक पद्धतीने सजवले होते.

केरळ राज्याला 1956 साली स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे केरळ राज्याची स्थापना होऊन 64 वर्ष उलटली असल्याचे सांगताना या समाजातील नागरिकांचा ऊर अभिमानाने भरून आला. मात्र, आमचा जन्म केरळमध्ये झाला असला, तरी आम्ही तरुण असतानाच महाराष्ट्रात आलो आणि डोंबिवलीकर झालो. डोंबिवलीच्या मराठी संस्कृतीचा भाग होताना आम्हाला कोणत्याही प्रकारची हीन वागणूक डोंबिवलीच्या नागरिकांकडून देण्यात आली नाही.

उलटपक्षी सर्व केरलीयन आपल्यातीलच एक असल्याची भावना त्यांनी स्वतः मध्ये आणि आमच्यातही रुजवली, असे नायर यांनी सांगितले. डोंबिवलीकर असणारा आणि मॉडेल शाळा व मॉडेल महाविद्यालयाचा विद्यार्थी असणारा विशाख याने रोज 45 मीटर धावून एक वर्ल्ड रेकॉर्ड केल्याने आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT