Dombivli Snake Rescued  Pudhari
ठाणे

Dombivli Snake Rescued | भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी केंद्रात धामण सापाचा शिरकाव; कामगारांची भंबेरी

सर्पमित्राकडून सुखरूप रेस्क्यू करून सापाला

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Stray Dog Sterilization Center

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी केंद्रात अर्थात निर्जीबीन केंद्रात गुरूवारी (दि.२०) ७ ते ८ फूट लांबीच्या सापाने प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी असलेल्या बैल बाजार येथील या केंद्रातील स्वयंपाक घरात हा साप शिरला होता. अचानक साप दिसताच तेथील कामगारांची भंबेरी उडाली.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे यांना पाचारण करण्यात आले. बोंबे यांनी अत्यंत कौशल्याने या भल्या मोठ्या सापाला चिमट्याच्या मदतीने पकडून पिशवीत बंद केले. त्यानंतरच केंद्रातील कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पकडण्यात आलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा असून त्याची लांबी सुमारे सात फूट असल्याचे दत्ता बोंबे यांनी सांगितले. वन विभागातील अधिकाऱ्यांच्या परवानगीने या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याचेही बोंबे यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये अजूनही दहशत

सापाच्या घटनेने लक्ष वेधून घेतले असले तरी कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अद्यापही गंभीर बनला आहे. विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी केवळ २४ तासांत कल्याण शहरात दोनशेहून अधिक रहिवाशांना भटक्या कुत्र्यांनी लक्ष्य केले होते.

त्यानंतर महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी नसबंदी केंद्राची पाहणी करून कंत्राटदाराला भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांना १५ दिवस उलटून गेले तरीही भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिका प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT