डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरात नाले आणि गटारांच्या बांधकामांत निष्कृष्ट दर्जा असल्याचा आरोप करणारा अर्ज माहिती अधिकारात अभियंत्यांकडे टाकून हा अर्ज मागे घेण्यासाठी ठेकेदारकडे १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी ४ खंडणी बहाद्दरांना बेड्या ठोकल्या.
दिपेश गौतम लोखंडे (३९, घणसोली), राहूल सुधाकर मुकादम (३०,कोनगांव), विशाल गंगाराम जानकर (३१, पनवेल ), नरेश राजेंद्र सुर्यवंशी (२९, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. अजवानी-मेटकन जॉईंट व्हेंचर या कंपनीला डोंबिवली एमआयडीसीमध्ये नाले व गटारांच्या बांधकामांचा ठेका दिला आहे.