मानपाडा पोलिसांनी कुणाल शिंगाडे याला अटक केली  Pudhari
ठाणे

Dombivli Crime: प्रेमसंबंध तोडल्याचा राग; डोंबिवलीत विवाहितेला 70 व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Manpada Police Station: मानपाडा पोलिसांनी ठोकल्या तरुणाला बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Women Blackmail Case

डोंबिवली : मैत्रीच्या आडून विवाहित महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करून तिचे ७० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून संबंध तोडल्यास ते व्हायरल करण्याची धमकी देण्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कुणाल शिंगाडे ( वय २२) या तरुणाला अटक केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागातील शिरढोण परिसरात राहणाऱ्या कुणालची एका विवाहित महिलेशी ओळख होऊन मैत्री झाली होती. या मैत्रीचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. याच दरम्यान तिचे ७० हून अधिक खासगी व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केले. काही काळानंतर महिलेला आपली चूक लक्षात येऊन तिने हे प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय घेतला.

हे समजताच कुणाल भ्रमिष्ट झाला. त्याने त्या महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. संबंध तोडल्यास तुझे सर्व व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करेन, अशी धमकी दिलीच, शिवाय महिलेचे काही फोटो पतीला पाठवून तिचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पिडीत महिलेने अखेर धाडस दाखवत मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन बेतलेल्या सर्व प्रसंगांची कहानी कथन केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी त्या महिलेला धीर दिला आणि तपास चक्रांना वेग देऊन आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले. पीडित महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी कुणाल शिंगाडे याला अटक केली. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT