Dombivli Crime : डोंबिवलीत रिक्षाचालकाचा काळा धंदा उघड; दीड लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

Dombivli Crime
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : डोंबिवलीत रिक्षा चालवण्याच्या आडून गोरखधंदा करणाऱ्या एका रिक्षाचालकाचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली. रामचंद्र कोळेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो टिटवाळा येथील रहिवासी आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामचंद्र कोळेकर हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. मात्र, या व्यवसायाच्या आडून तो एमडीसारख्या घातक अमली पदार्थांची विक्री करत होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून जवळपास दीड लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करून रामचंद्र कोळेकर याला अटक केली आहे. हे ड्रग्ज तो कुठून आणत होता आणि डोंबिवली परिसरात कोणाला विकणार होता? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news