डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : सुंदर रंग, दरवळणारा सुवास, झाडांवर डोलणारी सुंदर गुलाबाची फुले पाहून मन अगदी प्रफुल्लित झाले होते. औचित्य होते डोंबिवली पूर्व येथील बालभवन येथे भरलेल्या गुलाब प्रदर्शनाचे. (Dombivli)
दरवर्षीप्रमाणे यंदाही 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल'चे १३ ते १५ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे हे १३ वे वर्ष आहे. यामध्ये राज्यातील विविध ठिकाणहून आणलेल्या गुलाबांच्या विविध जातींचे तसेच विविध रंगाचे, सुवासिक गुलाब पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आयोजित केले आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंत्री चव्हाण यांच्या हस्ते या प्रदशनाचे उद्घाटन झाले आहे. (Dombivli)
यंदाही डोंबिवलीतील गुलाब प्रदर्शन हे राज्यस्तरीय स्वरुपाचे आहे. सकाळी १० ते रात्री ०९ पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. इंडियन रोझ फेडरेशन अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्था डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्या आहेत. मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, नाशिक शहापूरमधील गुलाब उत्पादकही सहभागी झाले असून फेस्टिवलमध्ये अभिनव प्रकारच्या गुलाब स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बघण्यासाठी शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख गुलाब उत्पादक कल्याणचे डॉ. म्हसकर व वांगणीचे मोरे बंधू पहिल्या वर्षांपासून प्रदर्शनात सहभागी होत आहेत. दोघांनीही गुलाब लागवडीत पथदर्शक काम केलं आहे. डॉ. म्हसकर कल्याण डोंबिवलीतील प्रख्यात प्रसूतीतज्ज्ञ असून ते गुलाबप्रेमी आहेत. तर वांगणीच्या आशीष मोरे यांनी भारतातील विविध गुलाब प्रदर्शन स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत.
हेही वाचा;