Fact Check Dombivli Rain
कल्याण : डोंबिवलीत निळा पाऊस पडला नसून एका टेम्पोमधून निळ्या रंगाचे पाणी जमिनीवर पडून वाहत असल्याचे दिसून आले. नागरिकांमध्ये गैरसमज पसरवला गेल्याची माहिती कामा संघटनेचे अध्यक्ष राजू बेल्लूर यांनी दिली.
ते म्हणाले की, डोंबिवली फेस-2 मध्ये एक टेम्पो उभा होता. त्यातून निळ्या रंगाच्या मालाची वाहतूक केली होती. टेम्पो रिकामा करून वाहकाने त्याठिकाणी उभा केला होता. त्यातील निळा रंग रस्त्यावर पडला.
मात्र दुसर्या दिवशी पाऊस पडल्याने निळा रंग वाहून गेला. हे रासायनिक केमिकल नाही, असेही त्यांनी सांगितले.