ठाणे

Dombivali : गुन्हेगाराची ओळख पडली महागात ! घरगुती पार्टीमध्ये सहभागी झालेल्या आरोपीने पोलिसावरच केले वार

backup backup

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : घरगुती पार्टी आयोजित करणारी व्यक्ती पोलिस अधिकाऱ्याची ओळख आरोपी करुन देत होती. यावेळी त्या पोलिस अधिकाऱ्याने या व्यक्तीस मी ओळखतो व एका गुन्ह्यात मी त्यांना अटक करण्यास गेलो होतो सांगितले. पोलिसाची ओळख सांगण्याची पद्धत न रुचल्याने रागाला येऊन त्या आरोपीने थेट पोलिसावरच चाकूने वार केले. तर हे भांडण सोडायला गेलेल्या महिलेवर देखिल आरोपीने वार केले. अशा प्रकारे पोलिसाला गुन्हेगाराची ओळख भलतीच महागात पडली. या घटनेत वार झालेले पोलीस कर्मचारी सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेची बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. (Dombivali)

कल्याण पश्चिमेतील साई श्रीहरी सोसायटीत राहणारे देवेंद्र शास्त्री यांनी घरात छोटी पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये त्यांनी कल्याण परिसरात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी दीपक देशमुख आणि देवेंद्र यांचा मित्र सुरेश काळे यांना आमंत्रित केले होते. यावेळी आमंत्रित केलेल्या सुरेश काळे यांची ओळख देवेंद्र यांनी पोलीस दीपक देशमुख यांच्याशी करून दिली. मात्र देशमुख यांनी एका गुन्ह्यासंदर्भात मी यांना अटक करण्यासाठी गेलो होतो असे सांगून अटक वॉरंट संदर्भात माहिती देण्यास सुरुवात केली. ही माहिती देताच सुरेश काळे यांनी त्यांच्याकडील चाकू काढून दीपक देशमुख यांच्या मानेवर वार केले.

दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या देवेंद्र यांच्या पत्नीवर देखील सुरेश याने वार केले. दीपक यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ला करुन पसार झालेल्या सुनील काळेचा बाजारपेठ पोलिस शोध घेत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT