ठाणे

ठाणे : दिघा रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांसाठी खुले होणार

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे शहराला लागून असलेले दिघा रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी लवकरच खुले होणार आहे. येत्या १० दिवसांत या स्थानकाचे उदघाटन केले जाणार आहे. २०० कोटी रुपये खर्च करून हे रेल्वे स्थानक उभारण्यात आले असून, दिघा रेल्वे स्थानकाचा फायदा ठाणे शहरालाही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. याचबरोबर रखडलेली उरण लोकल येत्या १० दिवसांत सुरु होत आहे. यामुळे महामुंबईच्या विस्ताराला गती मिळणार आहे.

ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानक रेल्वेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. बेलापूर, खार-कोकण, कोकण- उरण अशी रेल्वे सेवा सुरु होत आहे. ६ एप्रिलला होणारे दिघ्याचे लोकार्पण पुढे ढकलले गेले होते. ते आता येत्या १० दिवसांत होणार आहे. विटावा, दिघा येथील रहिवाश्यांना हे स्थानक फायदेशीर आहे. ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॅरिडॉरचा पहिला टप्पा म्हणजे दिघा स्थानक आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने हा टप्पा सुरु केला आहे. हे स्थानक सुरु झाल्यांनतर सर्व लोकलला येथे थांबा मिळणार आहे. या स्थानकाचे काम २०० कोटी रुपये खर्च करून करण्यात आले आहे. या स्थानकामुळे २५ टक्के ठाणे शहराला त्याचा फायदा होईल.

या स्थानकाची घोषणा २०१४ मध्ये झाली होती. तर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानकाचे भूमिपूजन केले होते. मात्र जमीन अधिग्रहण वेळेत न झाल्याने प्रकल्पाला उशीर झाला. स्थानकात २ फलाट असून, त्याची लांबी २७० मीटर तर रुंदी १२ मीटर आहे. स्थानकावर उद्वाहक, चार सरकते जीने कार्यान्वयित करण्यात आले आहेत. दिघा नंतर दुसरा टप्पा कळवा एलिव्हेटेड रेल्वे स्थानक असणार आहे. यासाठी ४७६ कोटी रुपये एवढा खर्च असणार आहे. हा मार्ग दिघा स्थानकाला जोडला जाणार आहे. याचबरोबर कल्याण, अंबरनाथ, बदलापूरहून येणाऱ्या प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी कळवा व दिघ्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी होईल. एमयूटीपी तीन मधील नवीन कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पामधील विकासासाठी ७०० प्रकोप बाधितांना पर्यायी जागा देणे गरजेचे झाले आहे. यासाठीही पावले उचलली जात आहेत.

    हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT