ठाणे : मी या दोनशे दिवसात कधी बोलायचं,कधी नाही बोलायचं हे शिकलो. धनंजय मुंडेची जीभ घसरली असं कधीच झालं नाही.ज्याला ज्याला जे जे बोलायचं आहे ते बोलू द्या, मी बोलणार नाही,जी क्रिया मी केलीच नाही त्याची प्रतिक्रिया मी का देऊ?मी जर एका प्रतिक्रियेला एक उत्तर दिलं असतं तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारायला झालं असतं म्हणून मी बोललो नाही, संयम ठेवला. मात्र या दोनशे दिवसांत , मी दोन वेळा मरता मरता वाचलो. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा, धनंजय मुंडेंच्या जातीपर्यंत, जिल्ह्यापर्यंत आई बाप मुलाबाळापर्यंत द्वेष कशाला. जगाच्या पाठीवर अशाप्रकारची मीडिया ट्रायलद्वारे बदनामी कुठेच झाली नसेल. अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर पहिल्यांदाच मुंडे व्यक्त झाले.
वंजारी समाजाच्या वतीने रविवारी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला धनंजय मुंडे यांना वंजारी समाजाच्या वतीने निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.जीवनात पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने गुणवंतांचा सत्कार करायला मला बोलावलं आहे. इतके दिवस तुम्ही बोलावत नव्हता. म्हणून मला येत येत नव्हतं. आता एकाएक तुम्ही मला बोलावलं आणि मी आलोय याला म्हणतात संघर्ष. आज ज्या सकल समाजाच्या वतीने समाजातील माझ्या हस्ते गुणवंतांचा सत्कार केला, आईची शपथ त्या समाजाने किती शिव्या दिल्या हे मला माहीत आहे मला खोट बोलायला जमलं नाही. असा भावनिक संवाद देखील मुंडे यांनी यावेळी समाजासमोर साधला. काल शिव्या देणारा आज आपल्या हातून सत्कार करतो त्यावेळेला खरा चमत्कार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
आज जे काही माझ्या सोबत झालं, मी राजकीय जीवनात आहे ते सर्व स्वीकारेन, टीका स्वीकारेन. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर करा, जर धनंजय मुंडे चुकलय तर त्याला कधीच माफ करू नये, माझ्यासहित जात, माझा जिल्हा एवढा बदनाम करावा हे योग्य नाही. एक दोन दिवस नाही दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची एखाद्या व्यक्तीची एखाद्या व्यक्तीच्या बदनामी करावी हे मी सर्व सहन केले.
त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता मरता राहिलोय. ज्या समाजात जन्माला आलो त्याचा अभिमान निश्चित आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेचा नंबर आठवतो यापेक्षा दुसरं काय हवं, मंत्री पदला काय चाटायचं असेही मुंडे यावेळी म्हणाले. दोष एका व्यक्तीचा असेल तर त्याला फाशी द्या पण त्या आधारावर सगळ्या समाजाला दोषी ठरवणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. आपण वंचित मधले किंचित आहोत,वंचित मधले किंचित असून एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणांना किंचित तरी राग येईल तो येणारच त्यामुळे त्रास होणारच. म्हणून कोणी बिंदू नामावली काढायची. हे आता सहन करणार नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. नये सफर मे खामोशी को अपनाया मैने, क्योकी बिना गलती के बहुत कुछ सुना है मैने या वाक्यावर धनु भाऊ तुम आगे बडो घोषणा सभागृहात घुमल्या.
माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले. मात्र नियतीने, न्यायव्यवस्थेने न्याय दिला. असे सांगत त्यानीं अप्रत्यक्षपणे माणिकराव कोकाटे यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. सत्य परेशान हो सकता है पराजित नाही. असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर पहिला आहे. जीवनातला प्रवास आठवला तरी आता सुद्धा अंगावर शहारा येतो. स्वर्गीय मुंडेसोबत संघर्षाच्या काळात सावली सारखा होतो. त्या संघर्षातून ते जिथपर्यंत ते पोहचले तेही मी पहिलं आहे.जे व्हायला नको होत ते झालं, पण कधी कधी वाटत साहेबांची एवढी दूरदृष्टी होती, मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्री मंडळात बहीण भाऊ मंत्री झाले नसते असेही धनंजय मुंडे म्हणाले