ठाणे : सुरेश साळवे
अवघ्या देशात, आखाती देशात आणि विदेशात आपल्या गँगचा ठसा उमटविणाऱ्या दाऊद इब्राहिम याची गॅंग काही वर्षातच अगदी वाळू प्रमाणे दाऊदच्या हातातून सटकली. दाऊद पाकिस्तानात सेटल झाला आणि तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्यामुळे दाऊद हा आजच्या स्थितीला कालबाह्य झाला. पण डी कंपनी म्हणजे दाऊद असे समीकरण जरी असले तरीही "डी" कंपनीच्या अस्तित्वासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले. काहींचा टोळीयुद्धात मृत्यू झाला. तर अनेकांना पोलिसांनी टिपले. पण डी कंपनीसाठी ऑक्सिजन ठरलेल्या छोटा राजन, सुभाष सिंग ठाकूर, शरद शेट्टी, असे नामचीन भाई यांच्या कारकिर्दीवर दाऊद अंडरवर्ल्ड डॉन झाला.
देशात आणि विदेशात रामराज्य पसरलेल्या दाऊद इब्राहिम याचे साम्राज्य त्याच्या कच्च्या कानामुळे आणि धर्मांध प्रवृत्तीमुळे संपले. तर आज काळ्या जगताच्या काळ्या पैशाच्या मलिद्यासाठी प्रत्येकाने आपापल्या टोळीचे अस्तित्व सिद्ध केले. मात्र आजच्या स्थितीला दाऊद इब्राहिम याचे अस्तित्वच राहिलेले नाही. दाऊद गँगची कामं सांभाळणाऱ्या अनिस आणि शकील यांना या गॅंगवॉरमध्ये टाकताच आलेले नाही. त्यामुळे काळ्या जगतातील त्यांच्या नावाचा ठसाही उमटू शकला नाही. थोडक्यात दाऊद हा शेखचिल्ली प्रवृत्तीचा असल्याने त्याचे साम्राज्य आज नष्ट झालेले आहे. तर बिष्णोई सारख्याचा अंडरवर्ल्ड डॉन म्हणून उदय होतोय एवढी नामुष्की आज दाऊद याच्यावर ओढवलेली आहे.
दाऊद हा महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला असल्याने मुंबई शहरातील छोट्या टोळ्यांना घेऊन दाऊदने डी कंपनी स्थापन केली. मात्र टोळ्यांनी डी कंपनीला विरोध करीत आपला कारभार सुरू ठेवला. डी कंपनीची ताकद ही छोट्या टोळ्या नाही तर मराठी आणि महाराष्ट्रीयन तरुणाच्या गँगच्या ऑक्सिजनमुळे "डी" कंपनीची ताकद वाढली आणि दाऊदने स्मगलिंग आणि काळे धंदे, शस्त्र विक्री, सुपाऱ्या, खंडण्या घेण्याची कामे सुरू केली. त्याला काही काळानंतर अमली पदार्थ चरस गांजा, अफिम या धंद्यांनी आर्थिक उभारी दिली. मात्र डी कंपनी मजबूत झाल्यानंतर दाऊद याला वेळेपूर्वीच डॉन झाल्याचा भास झाला. अन् दाऊद दुबईला आणि आखाती देशाच्या आश्रयाला गेला.
दुबईत बसून दाऊद च्या "डी" कंपनीच्या फिल्मीजगत, काळे धंदे, खंडण्या, प्रोटेक्शन मनी, फायनान्स करणे अशा विविध पद्धतीने "डी" कंपनीला आर्थिक उत्पन्न होत होते. दाऊदच्या दिमतीला दुबईत स्थानापन्न झालेले छोटा राजन, शरद शेट्टी, आणि अनिल परब अशा मात्तबगार भाईंच्या टोळ्या मुंबईत आणि महाराष्ट्रात कामे सांभाळत होते. कलेक्शन करीत होते.
दरम्यान दुबईहून आवाज मात्र दाऊद द्यायचा आणि "सीआर" कंपनीची पोरं गेम वाजवीत होती. "डी" दि कंपनी ही छोटा शकील किंवा शरद शेट्टी, अनिस यांच्या जीवावर भक्कम उभी नव्हती तर सीआर कंपनीची पोरं आणि गॅंगवॉरमध्ये उतरलेला सुभाष सिंग ठाकूर यांच्या डेअरिंग मुले डी कंपनीचा मोठा बोलबाला होता. त्यात सुभाष माकडवाला अशा विविध शार्पशुटर यांची वर्सनी होती. दाऊदची दहशतीने फिल्मी सितारे हे दुबईला भेटी देऊन रंगारंग कार्यक्रम करीत होते. त्यात दुबईच्या बैलवेड्या शेखांच्या आंबट गरज दाऊदच्या माध्यमातून पूर्ण होऊ लागल्याने दाऊदला शेख हे सोने देणारी कोंबडी आणि शेख याना शौक पुरविणारी सोन्याची कोंबडी दाऊद वाटत होती. त्यामुळे दाऊदला संरक्षण मिळाल्यामुळे दाऊद हा मस्तवाल होता.
दाऊदची धर्मांध प्रवृत्ती
दाऊद हा धर्मांधही होता. यात शंका नाही. कारण दाऊदच्या साम्राज्याला जरी मराठी तरुणांचा भक्कम आणि हिंदू तरुणाचा पाठिंबा असला तरीही "डी" कंपनीत मुस्लीम वरचष्मा होता. दाऊदला उलटे बोलले की, त्याचे डेथ वॉरंट निघायचे. यमदूत हे एकतर टोळीतील शार्पशुटर होते. तर पोलीसही यमदूत म्हणून यायचे आणि त्याच्या डेथ वॉरंटची अंमलबजावणी व्हायची, त्यानंतर दाऊदने मराठी तरुणांना यमसदनी पाठविण्याचा सपाट सुरू केला. पण थोडक्यात गॅंगवॉरमध्ये कधीही जातीपातीचा विचार केला जात नव्हता.
कंपनीच्या विरोधात गेलेल्याला यमसदनी पाठवायचे हाच नियम होता. पण दौड यातही मुस्लीम शार्पशुटरना सपोर्ट करायचा आणि वाव द्यायचा, पण मुंबईतील काही शार्पशुटर भाई यांनी दाऊदला आव्हान दिल्यानंतर मायाडोळास, दिलीप बुआ (कोटक) सारख्या टेरर शुटरना पोलिसांद्वारे चकमकीत ठार करून काटा काढला. तरीही"डी" कंपनीतील मराठी गँगस्टर हे काहीही जातीपातीचे राजकारण करीत नव्हते. पण, दाऊदच्या एका दुबईतील पार्टीत गेलेल्या टेरर गँगस्टर उपस्थित असताना झालेल्या मस्ती मजाक मध्ये काही वल्गना केल्यानंतर छोटा शकील आणि अनिस यांनी दाऊदचे कान भरले. त्यावेळी दाऊदने उन्माद होऊन त्या गँगस्टर ज्याने दाऊदच्या स्मगलिंगची यशस्वी कामं सांभाळली आणि अब्जो रुपयांचा फायदा करून दिला.
त्या गॅंगस्टरला त्याच्या कामाचा मोबदला न देता विचारणा केल्याच्या रागामध्ये कच्च्या कानाचा दाऊदने त्याला संपवा असे पार्टीतील लोकांना सांगितले. मात्र ज्यांनी दाऊदच्या मेहुण्याच्या हत्येचा बदला घेतला. त्या सुभाष सिंग ठाकूर याला मदत केली. तसेच स्मगलिंगमध्ये माल उतरविण्यापासून तो ठराविक ठिकाणी पोहचविणाऱ्याला संपवा अशी भाषा केल्यानंतर दाऊदच्या "डी" कंपनीच्या बांधकामाचे वासे अवाक झाले. त्यांनी नकार दिला. अन् "डी" कंपनीच्या अनेक वर्षाच्या अखंड सत्तेनंतर अंडरवर्ल्डमध्ये फूट पडली.
दाऊदच्या धर्मांध आणि शेखचिल्ली प्रवृत्तीमुळे जवळच्या चुगलखोरांच्या माहितीने दिलेल्या आदेशानंतर अंडरवर्ल्डच्या जहाजामध्ये प्रथम भगदाड पडले आणि दाऊदच्या साम्राज्याचे काऊंटडाऊन सुरू झाले.