Dainik Pudhari Konkan Pudhari
ठाणे

Dainik Pudhari Konkan: ठाण्यात ‘दैनिक पुढारी’ कोकण सन्मान सोहळा; अकरा मान्यवरांसह नवदुर्गांचा गौरव

सामाजिक, प्रशासकीय व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान; महिला दिनानिमित्त विशेष पुरस्कार वितरण

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे येथे रंगणाऱ्या दैनिक पुढारी कोकण सन्मान सोहळ्यामध्ये अकरा मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये महाडचे युवा नेते विकास गोगावले, कल्याण-डोंबिवलीचे वास्तुविशारद संदीप पांडुरंग पाटील, उद्योजक विल्यम ॲन्थोनी तुस्कानो, युवा नेते अंबरनाथ नगर परिषदेचे निखिल सुनील चौधरी, रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, महिला उद्योजिका वैभवी प्रभात भालेकर,

नागरी आरोग्य केंद्र डोंबिवलीच्या वैद्यकीय अधिकारी भारती संदीप पाटील, आदिवासी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ, नवी मुंबईतील उद्योजक जितेंद्र गिरी, हिबी ग्रुपचे प्रमुख भूषण भानुशाली आणि महिला नेत्या चित्रा आस्वाद पाटील या अकरा जणांचा कोकण गौरव पुरस्कार देऊ न सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामिण भागात चांगले काम करणारे देहू बालशी, दिनेश परेड, संदीप केणे, प्रीती अरुण पाटील, हिरामन पाटील या पाच सरपंचांचाही यावेळी विशेष सन्मान होणार आहे.

महिला दिनानिमित्त चांगले काम करणाऱ्या महिला सीमा क्षिरसागर, संचालिका ॲडव्हान्स फॅशन टेक्नॉलॉली प्रायव्हेट लिमिटेड, सौ. चेतना चंद्रकांत मेहेर, माजी सभापती सौ. आशा डिसोझा, अध्यक्ष वेलांकणी शिक्षण संस्था, सौ. चंदा प्रकाश वनमाळी कामगार नेत्या, कु. ऋतुजा वसईकर, सिने दिग्दर्शक, डॉ. सोनल भरत चव्हाण, वैद्यकीय सेवा, सौ. गौरी आंग्रे, नगरसेविका, धनश्री गोडे स्टेशन प्रबंधक आदी नवदुर्गांचा यावेळी विशेष सन्मान होणार आहे.

त्याचबरोबर प्रशासकीय सेवेतील मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी कृष्णा जाधव आणि अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनाही प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्धल सन्मानित करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT