Dahi handi 2025 Thane Govinda Pathak World Record 10 Thar
ठाणे : प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात 2025 मधील पहिले 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्यांना 25 लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.
9 थरांपासून 10 थरांपर्यंतचा थरारक प्रवास
यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर 9 थरांचा विश्वविक्रम घडवला होता. गोकुळाष्टमीच्या या अभूतपूर्व विक्रमापेक्षा एक थर उंच जात कोकण नगर पथकाने नवा इतिहास घडवला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?
"गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. 10 थरांचा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे, तर संपूर्ण देशाची शान आहे. खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभरात ठसा उमटवला आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे साहेब यांची परंपरा आम्ही पुढे नेली आहे. आजचा हा क्षण तर अत्यंत गौरवाचा अभिमानाचा आहे"
संस्कृती युवा प्रतिष्ठान अध्यक्ष तथा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले,
"यापूर्वी आमच्या मंचावर 9 थरांचा विक्रम झाला होता. आज 10 थरांच्या नव्या उंचीवर पोहोचल्याचा प्रचंड अभिमान आहे. कोकण नगरच्या गोविंदांनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांची सांगड घालत महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवला आहे. मला विश्वास होता की, कोकणनगर विश्वविक्रम रचेल, माझा हा विश्वास सार्थ ठरला."
10 थरांचा विक्रम
10 थरांचा विक्रम मुंबईतील जय जवान गोविंदा पथक मोडणार अशी आशा होती. पण त्यापूर्वीच मुंबईच्याच कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने हे विश्वविक्रम केला आहे.