Chitra Wagh Pudhari
ठाणे

Chitra Wagh News| भाजपा गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही: चित्रा वाघ

नरेंद्र पवार प्रकरणाचा पोलिसांकडून निष्पक्ष तपास होईल, व्यक्त केला विश्वास

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी: भाजपा गुन्हेगाराला कधीही पाठीशी घालणार नाही. नरेंद्र पवार प्रकरणाचा पोलिसांकडून निष्पक्ष तपास होऊन त्यांना शोधून काढले जाईल, असा विश्वास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. त्या भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळाच्या ‘एकात्मतेचा राजा’ गणेशोत्सवास भेट देण्यासाठी आल्या होत्या.

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, पक्षासोबत काम करणारे सहकारी नरेंद्र पवार यांच्याशी संबंधित घटना ऐकून धक्का बसला आहे. त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार संबंधित पीडित महिला गणपतीच्या पहिल्या दिवशी त्यांच्या घरी दर्शनासाठी आली होती.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस निष्पक्षपणे तपास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थाध्यक्ष संतोष शेट्टी, सौ. शशिलता शेट्टी, प्रदेश सचिव सुनीता टावरे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा कल्पना शर्मा, पालिका सभापती रंजीता कोंडा, ममता परमाणी आणि सुगंधा टावरे उपस्थित होते.

गणेशोत्सवानिमित्त पाच गरीब व गरजू महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात शिलाई मशीन देण्यात आल्या. तसेच महिला भजन मंडळांचा आणि निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी राजे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT