Kasara local train block Pudhari File Photo
ठाणे

Kasara local train block: कसारा घाटात विशेष ब्लॉक; लोकल, मेल-एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार

मेल-एक्स्प्रेस वाहतुकीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कसारा इगतपुरी खर्डी विभागामध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचइ) संदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी 10 व 11 मे रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, सीएसएमटी कसारा थेट लोकल सेवा बंद असेल. तसेच मेल-एक्स्प्रेस वाहतुकीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 10 आणि 11 मे रोजी दुपारी 3.50 ते सायंकाळी 5.50 या वेळेत इगतपुरी -खर्डी दरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गावर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कसारा मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.

सीएसएमटीवरून कसाऱ्याकडे जाणाऱ्या काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.सीएसएमटीहून अनुक्रमे दुपारी 1.10, 2.17 आणि 2.46 वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंतच चालवण्यात येतील. कसाऱ्यावरून सीएसएमटीकडे येणाऱ्या काही लोकल आसनगाव येथून पुढे सुटतील.

कसारा सीएसएमटी लोकल (कसारा सुटण्याची वेळ दुपारी 3.35) आसनगावहून दुपारी 4.12 वाजता सुटेल. कसारा -सीएसएमटी लोकल (कसारा सुटण्याची वेळ दुपारी 4.16) आसनगावहून दुपारी 4.54 वाजता सुटेल. कसारा सीएसएमटी लोकल (कसारा सुटण्याची वेळ सायंकाळी 5.02) आसनगावहून सायंकाळी 5.39 वाजता सुटेल.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन

गाडी क्रमांक 12143 लोकमान्य टिळक टर्मिनस सुलतानपूर एक्स्प्रेस 10 मे रोजी टिटवाळा येथे दुपारी 4.48 ते सायंकाळी 5.06 दरम्यान थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक 15066 पनवेल गोरखपूर एक्स्प्रेस 11 मे रोजी टिटवाळा येथे त्याच वेळेत थांबवण्यात येईल.

गाडी क्रमांक 11071 एलटीटी बलिया कामायनी एक्स्प्रेस दोन्ही दिवशी खर्डी येथे दुपारी 3.28 ते सायंकाळी 6 दरम्यान थांबवण्यात येईल.गाडी क्रमांक 13202 एलटीटी राजगीर एक्स्प्रेस आटगाव येथे दुपारी 4.24 ते सायंकाळी 6.02 दरम्यान थांबवण्यात येईल.

गाडी क्रमांक 12139 सीएसएमटी नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस खडवली येथे दुपारी 4.20 ते सायंकाळी 5.40 दरम्यान थांबवण्यात येईल.गाडी क्रमांक 22221 सीएसएमटी हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस खर्डी येथे सायंकाळी 5.30 ते 6.50 दरम्यान थांबवण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT