Cooper Hospital: कूपर रुग्णालयाच्या स्वच्छतेची जबाबदारी दुसऱ्या कंत्राटदाराकडे

कूपर रुग्णालयातील सफाई कंत्राटदारांकडून सुरू आहे. त्याचा कालावधी 12 डिसेंबर 2025 रोजी संपला होत.
Cooper Hospital
Cooper HospitalPudhari
Published on
Updated on

मुंबई: झुरळ, उंदीर, अस्वच्छ वॉर्ड आणि रुग्ण सुरक्षेच्या तक्रारींमुळे चर्चेत आलेल्या कूपर रुग्णालयाची आरोग्य प्रशासनाने झाडझडती करण्याचे ठरवले आहे. रुग्णालयातील सफाई सेवा समाधानकारक नसल्याच्या तक्रारी वाढल्याने नवीन कंत्राटदाराला सफाईचे कंत्राट देण्यात आले आहे.

कूपर रुग्णालयातील सफाई कंत्राटदारांकडून सुरू आहे. त्याचा कालावधी 12 डिसेंबर 2025 रोजी संपला होत. त्यामुळे 1 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच एप्रिल महिन्यापासूनही सेवा सुरू ठेवण्याचे मौखिक आदेश देण्यात आले होते. मात्र रुग्णालयातील उंदीरांचा वावर, अस्वच्छ परिसर आणि रुग्ण सुरक्षेच्या मुद्द्यांवर गंभीर आक्षेप घेण्यात आले होते. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आला होता.

Cooper Hospital
Share Market: शेअर बाजारातील विदेशी गुंतवणुकीचा टक्का घटला; एकूण गुंतवणूक 14 वर्षांच्या नीचांकावर

या सर्व पार्श्वभूमीवर अखेर जुन्या कंपनीऐवजी दुसऱ्या कंपनीवर सफाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवीन कंत्राटदाराने कामकाज सुरू करताच रुग्णालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून विविध वॉर्ड, कॉरिडॉर आणि परिसराची साफसफाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, केवळ कंत्राट बदलून प्रश्न सुटणार नाहीत तर रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्ण सुरक्षा सातत्याने राखली जाते का, याकडे आता रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

रुग्णालयातील स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता कंत्राटदार बदलला असून शुक्रवारपासून स्वच्छता, साफसफाई सुरू केलीआहे.

-डॉ.छाया शिंदे, अधिष्ठात, कूपर रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news