Crime News  pudhari photo
ठाणे

kalyan land fraud: कल्याणमध्ये नगरसेवकासह ७ जणांवर गुन्हा दाखल

बनावट सत्यप्रतिज्ञापत्र केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कल्याण: मृत असलेल्या तीन व्यक्तींच्या बनावट सह्यांच्या आधारे कल्याण पश्चिमेतील उंबर्डेतील जमीनीचे रजिस्ट्रेशन कार्यालयात बनावट सत्यप्रतिज्ञापत्र तयार केल्याच्या आरोपाखाली शिंदे सेनेच्या माजी नगरसेवक सुनिल वायले यांच्यासह ७जणांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंबर्डेतील वडिलोपार्जित जमीन प्रकरणी प्रमोद गायकवाड यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या व्यवहाराशी संबंधित जयंतीलाल भोईर, रतन भोईर आणि सुमन भोईर हे तिघेही मयत आहे.

हे तिघेही जिवंत असल्याचे भासवून बनावट प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले. त्यांच्या नावाने खोट्या सह्या करून खरेदीखत करण्यात आले आहे. या प्रकरणात शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सुनील राजाराम वायले, निर्मला वायले, अलका वायले, किसान वायले यांच्यासह विकासक शिरीष दळवी, सुनील हरिचंदानी आणि जितू लालचंदानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीनाचा वाद मागे घेण्यासाठी गायकवाड कुटुंबाला धमकाविले जात आहे.

या संदर्भात शिंदे सेनेचे माजी नगरसेवक वायले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गायकवाड कुटुंबाशी आपला कोणताही थेट संबंध नाही. हा गुन्हा राजकीय दबावापोटी आर्थिक फायद्यासाठी दाखल करण्यात आला आहे. जमीनीचा व्यवहार हा मूळ मालक आणि बिल्डर यांच्यात झाला होता. या व्यवहाराची सर्व कागदपत्रे वैध आहेत. या प्रकरणात मला गोवण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT