Black Panther Pudhari
ठाणे

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‌‘ब्लॅक पँथर‌’ची पहिली नोंद; काळा बिबट्या कॅमेऱ्यात कैद

चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे 20 एप्रिल रोजी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या दुर्मिळ प्राण्याचे छायाचित्र टिपण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये प्रथमच काळ्या बिबट्याची नोंद झाली असून, हा वन्यजीव संवर्धनासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे 20 एप्रिल रोजी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या दुर्मिळ प्राण्याचे छायाचित्र टिपण्यात आले. त्यानंतर 20 व 21 एप्रिल रोजी वेगवेगळ्या बीटमध्ये आणखी दोन छायाचित्रे मिळाल्याने या परिसरात काळ्या बिबट्याची उपस्थिती निश्चित झाली आहे.

वन विभागाच्या माहितीनुसार, प्रकल्पात यापूर्वी कधीही अशा प्रकारची नोंद झालेली नव्हती. कॅमेरा ट्रॅप तपासणीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना हा दुर्मिळ क्षण टिपलेला आढळला. सलग दोन दिवसांत तीन स्वतंत्र छायाचित्रे मिळाल्यामुळे ही नोंद अधिक विश्वासार्ह ठरली आहे.

‌‘ब्लॅक पँथर‌’ ही स्वतंत्र प्रजाती नसून बिबट्याचाच एक प्रकार आहे. शरीरात मेलानीन रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा रंग पूर्ण काळा दिसतो. विशेष म्हणजे काळ्या रंगातही त्यावरील ठिपक्यांचा (रोझेट) नमुना काहीवेळा दिसून येतो.

ही एक अनुवांशिक अवस्था असून कोणताही आजार नाही. या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध दुर्मिळ व संकटग्रस्त सस्तन प्राण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पात आता काळ्या बिबट्याचाही समावेश झाल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

स्थापना : 5 जानेवारी

क्षेत्रफळ : 1,165.57 चौ.कि.मी.

समावेश : चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना वन्यजीव अभयारण्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT