Black Magic Fraud Pudhari
ठाणे

Black Magic Fraud: काळी जादूची भीती दाखवून 1.66 कोटींचा घातला गंडा; मंजुनाथ शेट्टी याच्या विरोधात गुन्हा

सदरचा प्रकार हा फेब्रुवारी 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत घडला.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: तुमच्या जीवाला धोका आहे. त्याच्या निवारणासाठी काळी जादू, पूजा विधी आणि 12 ज्योतिर्लिंगच्या अमिषापोटी तब्बल 1 कोटी 66 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात पुजारी मंजुनाथ शेट्टी याच्या विरोधात नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. कासारवडवली पोलीस अधिक तपास करीत आहे. सदरचा प्रकार हा फेब्रुवारी 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत घडला.

तक्रारदार 25 वर्षीय तरुणी असून ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट येथे राहणारी आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत तारकरदार या तरुणीने मंजुनाथ शेट्टी नावाच्या इसमाशी संपर्क झाल्यानंतर त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन करून ओळखीचा फायदा घेत तक्रारदाराच्या कुटुंबियांवर नातेवाईकांनी काली जादू केली आहे. यामुळे ‌‘तुमच्या जीवाला धोका आहे‌’ अशी भीती निर्माण केली. यावर उपाय म्हणून केरळमधील पुजाऱ्यांमार्फत विविध पूजा व 12 ज्योतिर्लिंग यात्रा करण्याचा सल्ला देण्यात आला.

फेब्रुवारी ते एप्रिल 2024 दरम्यान त्याने सुरुवातीला 10 लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर वेळोवेळी नवीन कारणे देत आणि भीती दाखवत त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. न्यायालयीन प्रकरणे, अपूर्ण पूजा विधी आणि भविष्यातील संकटांची भीती दाखवत मे 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत विविध बँक खात्यांवर तब्बल 1.56 कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले.

अशाप्रकारे एकूण रक्कम 1.66 कोटींवर पोहोचल्यानंतरही त्याने पैसे मागणे सुरूच ठेवले. त्यामुळे संशय बळावल्याने कुटुंबाला फसवणुकीची जाणीव झाली. आरोपीने अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT