Crime News pudhari photo
ठाणे

Bhiwandi crime : अघोरी उपचारांच्या नावाखाली महिलेवर अत्याचार

भिवंडीत भोंदू मौलवीचा संतापजनक प्रकार; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : आजार बरा करण्याच्या नावाखाली अघोरी विद्येचा आधार घेत ३० वर्षीय महिलेवर सलग १५ दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील एका दर्ग्यात उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे, तर या अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते प्रसारित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मौलाना इस्माईल (५०) आणि त्याचा साथीदार इरफान या दोघांना भिवंडी शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी दवाखान्यात असिस्टंट म्हणून काम करते. विशिष्ट आजाराने त्रस्त असल्याने ती १ जून २०२४ ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत मौलाना इस्माईल याच्याकडे उपचारासाठी दर्ग्यात जात होती. आजार बरा करून देण्याचे आमिष दाखवत मौलानाने तिला प्रथम तंत्र-मंत्र म्हणण्यास सांगितले. त्यानंतर महिलेचे बांधलेले केस सोडून लिंबू कापून एका बाजूला फेकून देण्यात आले.

जादूटोणा आणि अघोरी विद्येच्या नावाखाली हा प्रकार सुरू झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुढील सलग १५ दिवस महिलेला दर्ग्यात बोलावून तिचा विनयभंग आणि जबरीने अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी मौलाना इस्माईल आणि इरफान या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली असून, या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच चित्रीकरण केलेला व्हिडिओ नेमका कुठे प्रसारित करण्यात आला, याबाबतही तपास सुरू आहे.

अत्याचाराचे चित्रीकरण; नंतर धमकी

या अत्याचाराचे मौलाना इस्माईल याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मौलानाने पीडित महिलेला फोन करून अत्याचाराचा व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे सांगितल्याने ती घाबरली. या प्रकारानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.पीडितेच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२), ७७, ७८, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम २०१३ मधील कलम ३, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ ई आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT