Voter List  Pudhari
ठाणे

Bhiwandi Voter List: भिवंडीतील तीन मतदारसंघांतून दीड लाख मतदार गायब

तब्बल ३० हजार मयत; ६ लाख मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण; पुन्हा यादीत येण्‍यासाठी करावी लागणार प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

संजय भोईर

भिवंडी: सर्वेक्षणाच्या माध्यमातून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्याच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यात असलेल्या तीन मतदारसंघातून तब्बल एक लाख ७९ हजार २२८ मतदार गायब तर ३० हजार ७८० मतदार मयत असल्याचे समोर आले आहे.

भिवंडी तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम तर ग्रामीण भागात भिवंडी ग्रामीण अशा तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून यामध्ये वाडा तालुक्यातील ६० मतदान केंद्रांचा समावेश आहे.

या तिन्ही विधानसभा मतदारसंघ मिळून विधानसभा निवडणुकी वेळी असलेल्या १० लाख ६६ हजार ७१२ मतदारांपैकी अवघे ६ लाख ५८ हजार ९६५ मतदारांचे डिजिटाईझेशन पूर्ण झाले असून ४ लाख ७ हजार ७४७ नावे वगळण्यात आली आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक १ लाख ८४ हजर ६९२ नावे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वगळण्यात आली आहेत.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रासोबतच लगतच्या ग्रामीण भागात स्थलांतरित मजूर वर्गाचा भरणा अधिक असल्याने अनेकांनी आपली नावे भिवंडी सोबतच आपल्या मूळ गावी मतदार यादीत सुद्धा समाविष्ट ठेवली होती.अशी ३७ हजार २४६ दुबार नावे वगळण्यात आली तर १ लाख ५० हजार ५१७ मतदार स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत ज्या मतांच्या जीवावर उमेदवार विजयी होत असतात.त्यामधील किमान पन्नास टक्के नावे मतदार याद्यांच्या पुनर्विलोकन अर्थातच एस आय आर मध्ये बाद ठरल्याने अनेकां कडून भुवया उंचावल्या जात आहेत.

भिवंडी पूर्व मतदारसंघ स्थिती

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात २०२४ मध्ये नमूद ३ लाख ७६ हजार १३८ मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ४४६ मतदारांची नोंद यशस्वी झाली असून १ लाख ८४ घर ६९२ नावे वगळण्यात आली आहेत.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४६ हजार ७७४ मतदारां पैकी १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांची नोंद यशस्वी झाली असून तब्बल १ लाख ५५ हजार ८५ मते बाद झाली आहेत.

तर शहरातील नावे वगळण्याच्या संख्येपेक्षा भिवंडी ग्रामीण मतदारसंघात परिस्थिती चांगली आहे.या मतदारसंघात ३ लाख ४३हजार ८०० मतदारांपैकी २ लाख ७५ हजार ८३० मतदारांची नोंद यशस्वी झाली असून ६७ हजार ९७० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

तीन मतदारसंघात कमी झालेले मतदार

भिवंडी ग्रामीण

२०२४ मतदार - ३,४३,८००

डिजिटाईझ - २,७५,८३०

बाद मत - ०,६७,९७०

मयत - ११,२५७

अनुपस्थित - २६,५६९

स्थलांतरीत - २३,४८९

दुबार नोंद - ०,६४५६

इतर - ०,०,२०२

भिवंडी पूर्व

२०२४ मतदार - ३,७६,१३८

डिजिटाईझ - १,९१,४४६

बाद मत - १,८४६९२

मयत - ०,८७४४

अनुपस्थित - ८६,२५६

स्थलांतरीत - ६८,२५६

दुबार नोंद - १५,६६२

इतर - ०,५७७६

भिवंडी पश्चिम

२०२४ मतदार - ३,४६,७७४

डिजिटाईझ - १,९१,६८९

बाद मत - १,५५,०८५

मयत - १०,७७९

अनुपस्थित - ६६,४०३

स्थलांतरीत - ५८,७७२

दुबार नोंद - १५,१२८

इतर - ०,४००३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT