प्रतिकात्‍मक छायाचित्र. Pudhari News.
ठाणे

Food Poisoning Case : भिवंडीत 'शोरमा' विषबाधेचा आकडा ५६ वर; दोन महिन्यांच्या गर्भवतीसह अनेकांवर उपचार सुरू

Bhiwandi Food Poisoning Case :अनेक नागरिकांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास, नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले

पुढारी वृत्तसेवा

Bhiwandi Food Poisoning Case

भिवंडी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात शोरमा खाल्ल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या आता ५६ वर पोहोचली आहे. सुरुवातीला केवळ १७ जणांना विषबाधा झाल्याची नोंद झाली होती. मात्र, त्रास होणाऱ्या नागरिकांचा आकडा वाढत असल्याने रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बाधितांमध्ये दोन महिन्यांच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे.

अनेकांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास

वंजारपट्टी नाका भागातील शोरमा खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता त्रास वाढल्याने रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात १७ बाधितांची संख्या समोर आली होती, पण त्यानंतर रुग्णांची संख्या वेगाने वाढत ५६ पर्यंत गेली. अद्यापही काही नागरिकांना अस्वस्थता आणि त्रास जाणवत असल्याने हा आकडा आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे.

नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले

घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. विषबाधा झालेल्या रुग्णांच्या उलट्या, विष्ठा आणि रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर विषबाधेचे नेमके कारण काय होते, हे स्पष्ट होणार आहे. दरम्‍यान, उघड्यावर किंवा अस्वच्छ ठिकाणी विक्री होणारे खाद्यपदार्थ खाणे टाळावे आणि नेहमी सुरक्षित व स्वच्छ ठिकाणीच खाद्यपदार्थांचे सेवन करावे. नागरिकांनी काळजी घ्‍यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी पंधारे यांनी केले आहे.

बाधितांमध्‍ये दोन महिन्यांची गर्भवती

बाधितांमध्‍ये दोन महिन्यांची गर्भवती आहे. अन्न व औषध प्रशासनाशी (FDA) संबंधित अतिरिक्त आयुक्तांशी मी स्वतः चर्चा केली आहे; त्यांनीही मंगळवारी घटनास्थळी भेट दिली होती. आम्ही संयुक्तपणे पाहणी केली, संबंधित व्यक्तींशी संवाद साधला आणि या संदर्भात आवश्यक ती पावले उचलली आहेत, असेही डॉ. माधवी पंधारे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT