भिवंडी : दिल्लीतील 22 वर्षीय नातेवाईक तरुणीला भिवंडीत शिक्षणासाठी आणल्यानंतर दोघा भावांनी तरुणीवर वारंवार 7 वर्षे आळीपाळीने अत्याचार करण्यासह तिचा मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी दोन भावांच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदिष उपाध्याय व संदिप उपाध्याय (रा.भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे असून दोघेही फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता दिल्लीतील येथे राहत असून ती सन 2018 मध्ये 10 वीत शिकत असताना नातेवाईक सुदीप पीडितेला शिक्षणासाठी मुंबईत घेवून आला. दरम्यान सुदीप हा गावी गेला.
असता संदीपने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर सदर बाब पीडितेने सुदीपला सांगितली. त्यानंतर सुदीप यानेही पीडिता आणि संदीप यांच्या संबंधांबाबत सर्वांना माहिती देईन अशी धमकी देवून पीडितेवर अत्याचार केला आहे. अशा प्रकारे दोघा भावांनी तक्रारदार तरुणीवर सन 2018 ते ऑगस्ट 2025 पर्यंत वेळोवेळी अत्याचारसह तिचा मानसिक छळ केला आहे.
याप्रकरणी पीडितेने प्रथम दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सदरचा गुन्हा 0 नंबरने येथील भोईवाडा पोलिस ठाण्यात वर्ग झाल्याने दोघा भावांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांची कुणकुण लागताच दोघेही भाऊ फरार झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.