Bhiwandi Black Magic Pudhari
ठाणे

Bhiwandi Black Magic: भिवंडीत जमिनीच्या वादातून केला जादूटोणा

गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

संजय भोईर

भिवंडी: सध्या राज्यात अनेक जादूटोणा बुवाबाजीचे प्रकार समोर येत असतानाच भिवंडी तालुक्यात शेजाऱ्यांसोबत झालेल्या क्षुल्लक वादातून त्यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील कोशिंबे येथील दोन कुटुंबांमध्ये जमिनीवरून जुना वाद सुरू होता. त्या वादामधूनच 14 एप्रिल रोजी रात्री 11.45 वाजता घरामागे शेजारी राहणारे प्रभाकर हे फिरत असल्याची माहिती एका भावाने दुसऱ्यास दिली.

त्यानंतर त्याने सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता आरोपी व त्याचा मुलगा असे दोघे घरामागे विश्वनाथ व त्याच्या पत्नीचा फोटो ठेवून त्यावर लिंबू, बिबवे, तांदूळ, मूग तसेच मक्याच्या बीया, अख्खे उडीद, अत्तर असे पानावर ठेवून त्यावर तांदूळ व कुंकू लावून जादूटोणा करीत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. दरम्यान या विषयीचा जाब शेजाऱ्यास विचारला असता, बायकोला जादू करून खल्लास करून टाकणार असल्याची धमकी यावेळी देण्यात आली. तसेच धमकी दिल्यानंतर ते दोघेजण तेथून पळून गेले.

जीवे मारण्याची धमकी...

याप्रकरणी दीपक याने प्रभाकर व त्याचा मुलगा हे दोघे अनिष्ट वअघोरी प्रथा व जादूटोण्याची कृती करून त्यांनी विश्वनाथ व त्याची पत्नी यांना जादूटोणा करून मारण्याची भीती घातली आहे, अशी तक्रार गणेशपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची चौकशी सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT