Ended life Pudhari Photo
ठाणे

Thane News : भाईंदरमध्ये दोघांनी जीवन संपवले

१७ वर्षीय मुलासह ५२ वर्षीय चालकाचा गळफास

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : भाईंदर परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह ५२ वर्षीय इसमाने वेगवेगळ्या घटनांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी नवघर आणि भाईंदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक फेजमधील हा १७ वर्षीय अल्पवयीन कुटुंबासह राहत होता. ३ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास त्याने राहत्या घरातील हॉलच्या गॅलरीतील हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेचा तपास पोलीस हवालदार दुधाळ करीत आहेत. दुसऱ्या घटनेत भाईंदर पश्चिमेतील राई, शिवनेरी गल्ली क्रमांक ८, उत्तन रोड परिसरात राहणारे तुकाराम मलकप्पा सकपाळ (५२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT