Bhayandar Police Raid Pudhari
ठाणे

Bhayandar Police Raid: भाईंदरमध्ये अश्लील चित्रपट दाखवणाऱ्या व्हीडिओ पार्लरवर पोलिसांचा छापा

माहितीच्या आधारे ३१ जुलै रोजी रात्री पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: भाईंदर पूर्व येथील एका व्हिडिओ पार्लरमध्ये पैशांच्या मोबदल्यात ग्राहकांना अश्लील चित्रफिती दाखवणाऱ्या अड्ड्यावर नवघर पोलिसांनी छापा टाकला. भाजी मार्केट परिसरातील सागर व्हिडिओ सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पार्लर चालकासह अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या १४ ग्राहकांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवघर पोलिसांना बी.पी. क्रॉस रोडवरील किरण अपार्टमेंटमध्ये असलेल्या सागर व्हिडिओ सेंटर येथे बेकायदेशीरपणे अश्लील चित्रफिती दाखवल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ३१ जुलै रोजी रात्री पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यादरम्यान पार्लरचा चालक-मालक अनिलकुमार केवलाप्रसाद गुप्ता (४४) हा पेनड्राईव्ह आणि डीव्हीआर मशीनच्या साहाय्याने एलईडी स्क्रीनवर ग्राहकांना अश्लील व्हिडिओ दाखवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी नवघर पोलिसांनी पार्लर चालक अनिलकुमार गुप्ता याच्यासह तिथे अश्लील चित्रफीत पाहणाऱ्या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT