जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा pudhari photo
ठाणे

Badlapur Domestic Gas Supply: बदलापुरात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व गॅस एजन्सींची बैठक; नागरिकांना घाबरू नका असा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : इराण आणि इस्त्राईल-अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतातील घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर झाला आहे. मात्र बदलापूर शहरात घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसून यापुढील काळात सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय ठेवून नागरिकांना गॅस सिलिंडर पुरवठ्यात कोणतेही अडचण निर्माण नाही असं काम करण्याचा निर्धार बदलापुरात करण्यात आला.

आमदार किसन कथोरे, उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अमित पुरी, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्यासह पुरवठा विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यासह बदलापुरातील घरगुती सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या विविध गॅस कंपन्यांचे चालक आणि मालक बैठकीला उपस्थित होते.

बदलापूर शहरात असलेल्या घरगुती सिलिंडर ग्राहकांना सुरळीत गॅस पुरवठा व्हावा, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागरिकांमध्ये कोणतेही पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊ नये व गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या गॅस सिलिंडर रिफील बुकिंग मुळे एक ते दोन दिवस उशिरा गॅस पुरवठा होत आहे. मात्र या पुढील काळात सुरळीत गॅस पुरवठा होण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वय ठेवून काम करतील असे विजयानंद शर्मा यांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये देशात गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगत गॅस एजन्सी ग्राहक, गॅस पुरवठा करणाऱ्या वाहनां बाबत कोणतिही अडचण असल्यास त्यांनी थेट पोलिसांची किंवा यंत्रणांशी समन्वय साधावा असे

आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. तर व्यावसायिक वापर व ज्या ग्राहकांकडे गॅस पाईपलाईन आहे व ज्यांनी यापूर्वी अनेक महिने सिलिंडरची मागणी केली तर अशा ग्राहकांना गॅस सिलेंडर देताना प्रथम ज्या ग्राहकांकडे गॅस पाईपलाईन नाही अशांना प्राधान्य द्यावेत. अशा स्पष्ट सूचना तहसीलदार अमित पुरी यांनी गॅस एजन्सी चालकांना दिल्या. त्यामुळे बदलापूर शहरात गॅस पुरवठा खंडित होऊ नये व त्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. तसेच ग्राहकांकडे गॅस पाईपलाईन आहे. त्यांनी गॅस सिलिंडर बुकिंग करण्याची घाई करू नये असे, आवाहनही आमदार किसन कथोरे यांनी केले असून बदलापूर शहरात गॅस पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व नागरिकांनीही सहकार्य करण्याचा आवाहन कथोरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT