Action against unauthorized pub in Thane
ठाण्यातील पब, लेडीज बारवर कारवाई करण्यात आली.  Pudhari
ठाणे

ठाण्यातील अनधिकृत पब, लेडीज बारवर पालिकेचा हातोडा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यात अनधिकृत पब, लेडीज बारवर ठाणे महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. संपूर्ण ठाण्यात नऊ प्रभाग समिती क्षेत्रात एकाच वेळी या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

पुण्यात घडलेल्या घटनेनंतर मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, मीरा भाईंदर तसेच ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या अनाधिकृत लेडीज बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. अधिवेशनात सरकारला घेरण्याचा विरोधकांचा डाव पलटवून लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आधीच कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार संपूर्ण ठाणे शहरात एकाच वेळी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

महापालिकेकडून शहरात एकाचवेळी कारवाई

सकाळी ११ पासून या कारवाईला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. यामध्ये घोडबंदर रोडवरील ओवळा नाका या ठिकाणी असलेल्या अनधिकृत मयुरी लेडीज बारवर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने बार जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर त्याच लाईनमध्ये असलेला खुशी या लेडीज बारवर देखील कारवाई करण्यात आली आहे. घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पब आणि लेडीज बार असून सर्वच अनधिकृत बारवर कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण ठाणे शहरात एकाच वेळी ही कारवाई सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT