chain pulling on Central Railway file photo
ठाणे

Thane | मध्य रेल्वेवर चेन पुलिंग करणाऱ्या 9657 व्यक्तींवर कारवाई

मध्य रेल्वेत अलार्म चेन पुलिंगची वर्षभरात 11,434 प्रकरणे

पुढारी वृत्तसेवा

रोहे : रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ट्रेनच्या लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर (गार्ड) यांना सतर्क करण्यासाठी अलार्म चेन आणीबाणीच्या परिस्थितीत खेचण्यासाठी तयार केलेली आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि रेल्वे सेवांची वक्तशीरपणा राखण्यासाठी ट्रेनमध्ये अलार्म चेनचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

परंतु रेल्वे प्रशासनाच्या निर्दशनास आल्यानुसार प्रवासी उशीरा पोहोचणे, उतरणे, मधल्या स्थानकांवर चढणे इत्यादी क्षुल्लक कारणांसाठी एसीपीचा गैरवापर करत असून अलार्म चेनचा गैरवापर हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. यामुळे एक वर्षापर्यंत कारावास, १००० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेचा समावेश असू शकतो.

मध्य रेल्वे एसीपी च्या अशा घटनांवर लक्ष ठेवून आहे. एप्रिल-२०२३ ते जून-२०२४ या कालावधीत, मध्य रेल्वेने अलार्म चेनच्या गैरवापराची ११,४३४ प्रकरणे नोंदवली. रेल्वे कायद्याच्या १४१ नुसार ९६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून ६३.२१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

विभागनिहाय प्रकरणे

मुंबई विभाग प्रकरणे - ४३८७, अटक ३७४१, दंड वसूल रुपये २३.४७ लाख, भुसावळ विभाग प्रकरणे-२९३१, अटक २८२४, दंड वसूल - रुपये २१.७६ लाख, नागपूर विभाग प्रकरणे- १७०६, अटक १४०४, दंड वसूल रुपये ८.७१ लाख, पुणे विभाग प्रकरणे-१९९२, अटक १४४०, दंड वसूल रुपये ७.७३ लाख सोलापूर विभाग प्रकरणे ४१८, अटक २४८, दंड वसूल रुपये १.५४ लाख अशी विभागनिहाय प्रकरणे करण्यात आली आहेत.

इतर प्रवाशांची होते गैरसोय

• अलार्म चेन खेचण्याच्या वैध कारणांमध्ये आगीच्या घटना, आरोग्य आणीबाणी, गुन्हेगारी प्रकरणे किंवा ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना अपघात यासारख्या आणीबाणीचा समावेश होतो.

• प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि कल्याणाची खात्री करण्यासाठी या परिस्थितीकडे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

• ट्रेनमधील एसीपीच्या कृतींचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनवर परिणाम होत नाही तर त्यामागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो ज्यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. पुढे एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT