Thane accident news : तीन दिवसांपुर्वी अपघात; ३ मृतदेह कुजलेल्या स्थितीत  File Photo
ठाणे

Thane accident news : तीन दिवसांपुर्वी अपघात; ३ मृतदेह कुजलेल्या स्थितीत

अपघातग्रस्त कार आढळली झाडाझुडपात; शहापूर तालुक्यातील उंबरमाली येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Accident three days ago; 3 bodies in decomposed condition

कसारा : शाम धुमाळ

शहापूरमध्ये एका कारमध्ये तिघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहापूरमधील उंबरमाली गावानजीक ही धक्कादायक घटना समोर आली आहे. ही कार अपघातग्रस्त असून झाडाझुडपात पडली होती. गुरांना चारण्यासाठी गेलेल्या महिलेला ही कार दिसली आणि तिने कारमध्ये डोकावून पाहिले असता तिला त्यामध्ये तिघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसले. हा अपघात चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात झालेल्या कारजवळ सदर महिला गेल्यावर दुर्गंधी येते असल्याने महिलेने गावातील लोकांना कळविले. त्यानुसार घटनास्थळी पोलिस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य यांनी धाव घेतली. शहापूर तालुक्यातील उंबरमाली येथे मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबई हन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर एक कार नाल्यातील झाडाझुडपा पडलेल्या अवस्थेत ही आढळून आली. या कारचा अपघात चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य शाम धुमाळ, देवा वाघ, दुर्गेश सोनवणे, धर्मेंद्र ठाकूर, बाळू सदगीर, फय्याज शेख, अरबाज शेख, नयन देवडीगे, गणेश बित्रर यांनी धाव घेत मदत कार्य सुरु केले. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेश गावीत, पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, पोलीस कर्मचारी उमेश चौधरी यांच्या मदतीने क्रेन या सहाय्याने कारची तपासणी केली असता या कारमध्ये तीन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

कारची माहिती घेतली असता ही कार मुंबई अंधेरी खार येथील असल्याचे समजले अधिक तपास केला असता या कारमध्ये यशेश वाघेला सह अन्य दोघांचे मृतदेह असल्याची माहिती मिळाली. या तीन्ही मृतदेहचे अंदाजे वय २५ ते ३० असल्याचे समजते. आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी मृतदेह बाहेर काढून मृतदेह खासगी व टोल रूग्‍णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्‍य केंद्रात रवाना करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT