सोलापूर

सोलापूर : मनसे कार्यकर्त्यांना पाेलिसांनी भोंगे वाजवण्यापासून रोखले

मोनिका क्षीरसागर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्‍या आवाहनानुसार येथे भाेंगे वाजविण्‍याचा प्रयत्‍न करणार्‍या मनसे कार्यकर्त्यांना पाेलिसांनी रोखले. राज ठाकरे सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण. त्यामुळे भाेंग्‍यावरुन आम्‍ही हनुमान चालीसा पठन करण्‍याचा प्रयत्‍न केला; परंतु पोलिसांनीआमचे भोंगे आणि ऍम्प्लिफायर जप्त केलेत. आमच्याकडे काय शस्त्रे आणि हत्यारे होती का? असा सवाल सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी केला.

हिंद्रकर, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, अभिषेक रंपुरे यांनी सोन्या मारुती व गणपतीसमोर महाआरती करण्याचा निश्चय केला होता. त्या पद्धतीने भोंगे, ऍम्प्लिफायर लावण्यात आले होते मात्र पोलिसांनी भोंगे वाजल्यापासून त्यांना रोखले आणि सर्व साहित्य जप्त केलं. शेवटी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडी आरती आणि हनुमान चालीसा पठन केले.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT