सोलापूर : सहा वर्षांच्या मुलासह महिला बेपत्ता झाल्याची घटना शहरातील घोंगडे वस्ती परिसरात घडली.
कविता गजानन बंकापुरे (वय 37, रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) ही महिला मुलगा तेजस गजानन बंकापुरे (वय 6) याला घेऊन 27 ऑक्टोबर रोजी घरातून कुणालाही न सांगता बाहेर पडली. तेव्हापासून ती घरी परतली नाही.
नातेवाईक, ओळखीचे व्यक्ती यांच्याकडे चौकशी करुनही तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.