Accident News pudhari photo
सोलापूर

Vijayapura Accident | चडचण तालुक्यात टिप्पर - दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

चडचण तालुक्यातील मरगूर साखर कारखान्यासमोर भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Chadchan Tipper Bike Accident

विजयपूर : जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील मरगूर साखर कारखान्यासमोर झालेल्या टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१६) घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, टिप्पर (क्र. TS 15 UD 3836) आणि दुचाकी (क्र. KA 28 HQ 4724) यांच्यात हा अपघात झाला. टिप्पर चालक रत्ननेश यादव हा चुकीच्या दिशेने (राँग साईडने) वाहन चालवत असताना नियंत्रण सुटल्याने त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मृतांची ओळख इंडी तालुक्यातील गोरनाळ येथील धर्मण्णा होसमनी आणि भीरप्पा पुजारी अशी झाली आहे. या अपघातात सोमय्या हिरेमठ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विजयपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना झळकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT