सोलापूर; पुढारी वृत्तसेवा; सांगोला तालुक्यातील श्रीराम ऑटोमोबाईल या मोटरसायकलच्या साहित्याच्या दुकानाला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगोला तालुक्यातील मोटरसायकलचे साहित्य मिळण्याचे एकमेव होलसेल दुकान म्हणूनच श्रीराम ऑटोमोबाइल हे प्रसिद्ध दुकान आहे. या श्रीराम ऑटोमोबाइल दुकानाला आज अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता प्राथमिक अंदाज आहे.
या शॉर्टसर्किटमुळे दोन मजली असलेले स्पेअर पार्टचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. श्रीराम ऑटोमोबाइल या दुकानाचे मालक नामदेव आदलिंगे असुन, या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचलंत का?