सोलापूर

Solapur News : पतीच्या मृत्यूप्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी

अविनाश सुतार

करमाळा: पुढारी वृत्तसेवा: पोलीस असलेल्या पतीने पोलीस पत्नीच्या त्रासाला कंटाळून बुधवारी (दि. ७) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जीवन संपविले होते. या प्रकरणी संशयित पत्नीला अटक केली होती. तिला आज (दि.९) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भार्गवी भोसले यांच्या न्यायालयात हजर केले असता सोमवार (दि.१२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. Solapur News

धनश्री बाळासाहेब मांढरे असे या संशयित महिला पोलिसाचे नाव आहे. धनश्री हिचा मित्र संशयित हवालदार शिंदे सध्या फरार झाला आहे. तर मृत आकाश तोगे असे पतीचे नाव आहे. या प्रकरणी मृत आकाश तोगे याचा भाऊ सुरज अभिमान तोगे (वय २७, रा. घोळवेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर, हल्ली मुक्काम भानूनगर, धाराशिव) यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. Solapur News

आकाश तोगे यांनी बुधवारी रात्री भाड्याच्या घरामध्ये जीवन संपवले होते. मृताचा भाऊ सुरज तोगे (वय 27) यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, धनश्री आणि तिचा साथीदार शिंदे यांच्या मारहाण आणि धमकीला कंटाळून आकाश तोगे याने टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे संशयित आरोपी म्हणून धनश्री मांढरे तसेच शिंदे यांच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे करत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT