सोलापूर

सोलापूर : राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत वेदांत मेस्त्रीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Shambhuraj Pachindre

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) पुरस्कृत पुरुषांच्या (एकेरी व दुहेरी) राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत बिगर मानांकीत महाराष्ट्राच्या वेदांत मेस्त्रीने सातव्या मानांकीत अजय कुंडूचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

एम.एस.एल.टी.ए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, सोलापूर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत बिगर मानांकीत वेदांत मेस्त्रीने सातव्या मानांकीत अजय कुंडूचा ४-६, ६-२, ६-३ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकीत फेरीत सार्थक सुदेनने प्रणव गाडगीळचा ६-०, ६-१ असा तर दुसऱ्या मानांकीत यश यादवने प्रसाद इंगळेचा ६-२, ४-६, ६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT