साेलापूर (वेळापूर), पुढारी वृत्तसेवा : वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील अकलूज-सांगोला रोड वरील विकास सोसायटी च्या शॉपिंग सेंटर मधील सांगोला रोडवरील असणाऱ्या भाग्यश्री ज्वेलर्स व महा इ केंद्र समोर अज्ञात इसमाकडून प्रवीण शशिकांत सावंत राहणार कोळेगाव यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला आहे.
सदर घटना मंगळवार १ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान घडली. यातील एक गोळी सावंत यांच्या वाहनांवर तर दुसरी हवेत गोळी झाडली, या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही, सदर घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शिवपुजे यांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केली व मार्गदर्शक सूचनाही केल्या. यावेळी वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे सह वेळापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
हे ही वाचलं का