Narayan Gad palkhi Modnimb
मोडनिंब: श्री क्षेत्र नारायणगड पालखीचे मोडनिंब शहरामध्ये रांगोळ्याचे पायघड्या घालून, पुष्पवृष्टी करुन आज ( दि.३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास स्वागत करण्यात आले. मोडनिंबकर या पालखीची सकाळपासून आतुरतेने वाट पाहत होते. मोडनिंब शेजारील अरण हे गाव श्री संत शिरोमणी सावता महाराज या थोर संताचे गाव आहे.
त्याच प्रमाणे दुपारच्या वेळेस भगवानगड पालखीचे आगमन झाले. ती पालखी मोडनिंब मध्ये नाष्टा, जेवण करून थोडा विसावा घेऊन पुढे बैरागवाडी (ता.मोहोळ) येथे मुक्कामी जाते. भगवानगड पालखी सोहळा संत भगवान बाबा यांनी सुरू केला. ते एक थोर संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी पंढरपूर, आळंदी आणि पैठण येथे पालखी सोहळ्याची प्रथा पाडली. पादुकास्थान येथे आपल्या गुरु परंपरेची सेवा म्हणून संत एकनाथ महाराजांच्या पालखीला आडवे जाण्याचा मान या दिंडीस आहे.
श्री क्षेत्र नारायणगड पालखी मोडनिंब येथे जि.प.शाळा व राजवाडा परिसरात मुक्कामी असते. पालखी साठी असंख्य दाते जेवणाची सोय करतात. या पालखीचे स्वागत सरपंच लक्ष्मीताई पाटील, उपसरपंच अमित कोळी, माजी सरपंच कैलास तोडकरी, दतात्रय सुर्वे, मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, ग्रामपंचाय सदस्य बालाजी पाटील, किरण खडके, कुरण गिड्डे, अमर ओहोळ, ग्राम महसूल मंडळ अधिकारी बिबिषण वागज, ग्राम महसूल अधिकारी मोहशीन हेड्डे यांनी केले.
मराठवाड्याचे असंख्य वारकरी या पालखीसोबत वारीत सहभागी होतात. नारायणगडाची पालखी पंढरपूरला जातांना पुढील मार्गाने येते. बेलुरा, बेलखंडी (पाटोदा), पाचेगाव (पाचंग्री), दुधानी, लहू (लव्हार), कुर्डूवाडी, मोडनिंब ही पालखी साधारणपणे २०० किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचते.