जेऊर : पुढारी वृत्तसेवा : थकित उसाची बिले मिळावीत, म्हणून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी-करमाळा महामार्गावर आज (दि.१०) चक्का जाम आंदोलन केले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
राजाभाऊ कदम म्हणाले की, मकाई, भैरवनाथ विहाळ, कमलाई पांडे, कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील घागरगाव, साई कृपा हिरडगाव या कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले नोव्हेंबर महिन्यापासून थकवली आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरी या सर्व कारखान्यांनी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांची ऊस बिले द्यावीत. अन्यथा कारखान्यांच्या चेअरमनच्या बंगल्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडल अधिकारी काजी यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी सभापती गहिनीनाथ ननवरे, सचिन काळे, मराठा सेवा संघाचे राजकुमार देशमुख, नंदकिशोर वलटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा