मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे बैठकीत मार्गदर्शन करताना  (Pudhari Photo)
सोलापूर

Ganesh Chaturthi | कोणत्याही नेत्याचा फोन आलातरी डॉल्बी लावून देणार नाही; मोहोळ पोलीस निरीक्षकांचा बैठकीत इशारा

Dolby Sound Ban | मोहोळ शहर व तालुक्यातील कोणत्याही गणेशोत्सव मंडळासमोर डीजे डॉल्बी लावू देणार नाही

पुढारी वृत्तसेवा

Mohol Police Dolby Sound Ban

पोखरापूर : सण उत्सवांच्या अगोदरच डीजे डॉल्बीच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने कडक धोरण अवलंबले असून कसल्याही परिस्थितीत मोहोळ शहर व तालुक्यातील कोणत्याही गणेशोत्सव मंडळासमोर डीजे डॉल्बी लावू देणार नाही, पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतरही कोणी डीजे डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण केले तर त्याच्यावर निश्चित कडक कारवाई करणार असल्याचा इशारा देत सण उत्सव पारंपारिक संस्कृती जपून मोठ्या आनंदात साजरे करण्याचे आवाहन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले.

मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था रहावी, याकरिता मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश उत्सव मंडळे, पोलीस पाटील, राजकीय पदाधिकारी यांची बैठक आयोजित करून त्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतकरे, पाटील आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना डीजे डॉल्बीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याबाबतच्या नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोणत्याही गणेशोत्सव मंडळासमोर डीजे डॉल्बी चा वापर करू नये. पोलीस प्रशासनाचे आवाहन झुगारून कोणत्याही मंडळाने डीजे डॉल्बीचा वापर केल्यास दंडात्मक स्वरूपात कडक कारवाई करणार आहे. मोहोळच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करत गणेश मंडळांनी विविध समाज प्रबोधन कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिर यासारखे उपक्रम राबवावेत असे आवाहनही पोलीस निरीक्षक शेडगे यांनी केले.

यावेळी राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक यांनी डीजे डॉल्बीच्या संदर्भात आवाज उठवत डॉल्बी बंदीच्या विरोधात सूचना मांडल्या. तसेच मंगल कार्यालयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डीजे डॉल्बीच्या वापरा संदर्भात संबंधित मंगल कार्यालय मालक व चालकांना सक्त सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी ही यावेळी मोहोळ शहरातील नागरिकांनी केली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डीजे डॉल्बीच्या संदर्भात कोणत्याही नेत्याचा मला फोन येत नाही आणि जरी आला तरी मी कारवाई करायला थांबणार नाही, असा इशारा देत वर्गणी च्या नावावर कोणीही खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये. वर्गणीच्या पैशासाठी कोणी त्रास देत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शेडगे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT