Solapur Mangalwedha road Car crash
कामती : सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर इंचगावजवळ आज (दि. 22) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन सांगोला येथे परतणाऱ्या पाच भाविकांच्या कारला हा अपघात झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पावसामुळे रस्ता ओला व निसरडा झाल्याने कार घसरून रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातग्रस्त कारचे चालक आदिनाथ एकनाथ मिसाळ (रा. चिनके ता. सांगोला) असून, त्यांच्यासह सर्व भाविक सुखरूप बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.